नव्या वर्षाची आज सुरुवात …
मराठी नव वर्षाची सुरुवात गुढी पाडवा या शुभ दिनी होते मात्र आपण पाच्यात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली नव वर्षाची आपण सुरुवात १ जानेवारीपासूनच करतो . हे जरी आपण इतर संस्कृतीचे अनुकरण करून करत असलो तरी आपल्यातली आपली संस्कृती हेच शिकवते कि'' आपल्या परीने इष्ट असेल ते चांगले ज्ञान ,आचार आणि विचार यांची भर संस्कृतीच्या कार्यात घडून आणणे होय ''
आणि जुन्या घोष्टी खूप काही शिकवत असतात मात्र जुन्यात नव्या विचाराची गरज आजच्या काळात भासत आहे . नवीन वर्षी नवीन काहीतरी शिकण्याची ,रूढी परंपरा यांचे अंधानुकरण न करता त्याच्यात योग्य परिवर्तन घडूवून आणण्याचीजिंद्द, विज्ञानाची व्याप्ती आणि तंत्राद्यानचा वापर आज करायारला हवा . विदये ची आराधना आणि ध्येयाची अमर्यात निष्टा हेच विचारात आणून कर्तव्य निष्ट व्यक्ती म्हणून आज जगतांना २१ व्या शतकाची मान अधिक उंच करण्याची शक्ती आपलयात आहे तिचा वापर करून साध्य असेल ते करता येउन आपल्या भारताची प्रगती करणे आवशक्य आहे.
नवीन वर्षी नवीनकार्य करण्याची उमेद आणि नवीन आशा बाळगून आजपासून नव भारत वर्षाची स्वप्ने बाळगून ते पूर्ण करण्याची जिद्द ठेवायला हवी .आणि युवा भारताने फक्त पार्टी वा एन्जोय करून नव वर्षाची सुरुवात न करता एक ध्येय बाळगून ते पूर्णत्वास नेण्यानेच भारताचे स्वप्ने साकार करण्याची उमेद जागरूक करावी
पूजा रामराव डोम .